Mumbai: वसईत आदिवासी महिलांना पोलिसांकडून मारहाण प्रकरण | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
1

#chitrawagh #harrasment #womenharrasment #vasai #mumbai #womensecurity
भाजप नेत्या चित्रा वाघ पोलीस उपायुक्तांच्या भेटीला 
दोषींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी 
वसईत आदिवासी महिलांना पोलिसांनीच केलेल्या मारहाण प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक  झालेल्या पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी आज वसईचे उपायुक्त संजय पाटील यांची भेट घेतली व स्वतः पीडित आदिवासी महिलांशी बातचीत करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. फक्त वसईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात अश्या प्रकारे खाकीच्या जोरावर पोलिसांनी अरेरावी केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक न करता पोलिसांनी चोर व बलात्काऱ्यांवर   खाकीचा जोर दाखवावा असे वक्तव्य करत घडलेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी दोषींना मागे न टाकता त्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...