2017 नवे वर्ष हे तंत्रज्ञानाचे नवे, अत्याधुनिक आविष्कार

5 months ago
5

तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी सजलेले २०१६ हे वर्ष आता संपत आले आहे. जेमतेम महिन्यात नवे वर्ष सुरू होईल आणि त्याबरोबरच तंत्रज्ञानाचे काही नवे आविष्कारही आपल्याला पाहायला मिळतील. अशाच नव्या वर्षात येऊ घातलेल्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल, नव्या उपकरणांबद्दल जाणून घेऊ या. याशिवायही अनेक तंत्रज्ञानविषयक अनेक ‘सरप्राइझेस’ आपली वाट पाहत आहेत.
विंडोज टेनसोबत चालणारे व्हीआर हेडसेट्स

वर्षाच्या पूर्वार्धात ‘विंडोज टेन’चे नवे अपडेट येत आहे. ते आल्यानंतर कोणालाही त्यांच्या पीसीला व्हीआर हेडसेट जोडता येऊ शकेल. या व्हीआर हेडसेट्सच्या किमती २०-२१ हजारांपासून सुरू होतील आणि डेल, असूस, लेनोव्हो अशा अनेक कंपन्या हे हेडसेट्स उपलब्ध करतील. ऑक्युलस रिफ्टसारख्या कंपन्यांचे हेडसेट्स ४१ हजार रुपयांच्या आसपास असतात. त्या मानाने हे नवे हेडसेट्स बऱ्यापैकी स्वस्त असतील.
सॅमसंग गॅलॅक्सी एस एट

गॅलॅक्सी नोट सेव्हन या स्मार्टफोनच्या बॅटऱ्या फुटल्यामुळे जगभरात अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याने सॅमसंगच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचला. त्यामुळे सगळे फोन मागे बोलावण्याची नामुष्कीही त्यांच्यावर ओढवली. अद्याप या फोनबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. तरीही त्यात ‘व्हिव’द्वारे चालवला जाणारा नवा डिजिटल असिस्टंट असेल, असे सॅमसंगने म्हटले आहे.
गुगलचा नवा पिक्सेल फोन?

२०१७मध्ये पिक्सेल फोनसाठी गुगल कंपनीने काय नियोजन केले आहे, याबाबत अद्याप फारशी वाच्यता करण्यात आलेली नाही; मात्र गुगलच्या हार्डवेअर क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा मात्र वाढीला लागल्या आहेत. त्यामुळे २०१७च्या अखेरीपर्यंत नव्या पिक्सेल फोनची गुगलकडून अपेक्षा करायला हरकत नाही.

Loading comments...