Shivsena Demand: पिंपरी चिंचवडची स्थायी समिती बरखास्त करा | Sarakarnama

3 years ago
2

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील(PCMC) सत्ताधारी भाजपचे(BJP) स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे(Nitin Landge) हे लाचखोरीत नुकतेच (ता. १८ ऑगस्ट) पकडले गेल्यानंतर विरोधकांना हत्तीचे बळ आले आहे. राष्ट्रवादीनंतर जागी झालेली शिवसेनाही(Shivsena) आता भाजपविरुद्ध मैदानात उतरली आहे. त्यांनी आज (ता. २० ऑगस्ट) पालिकेसमोर निदर्शने(Demonstrations) करीत स्थायी समिती बरखास्तीची मागणी केली. विशेष म्हणजे टक्केवारी व भ्रष्टाचाराचा आरोप नाही, तर एसीबीच्या कारवाईने तो सिद्धही झालेल्या स्थायी समितीत शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचेही सदस्य आहेत.
#Shivsena #Demonstrations #PimpriChinchwadMunicipalCorp #NitinLandge #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...