Mumbai:उद्धव ठाकरेंचा तो व्हिडीओ व्हायरल, आता भाजप करणार उद्धव ठाकरेंच्या विरोधात तक्रार |Sarkarnama

3 years ago
66

Mumbai :उद्धव ठाकरेंचा तो व्हिडीओ व्हायरल, आता भाजप करणार उद्धव ठाकरेंच्या विरोधात तक्रार

Mumbai : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून 'मी असतो तर कानाखाली लगावली असती', असे वादग्रस्त विधान केले. याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने त्यांना अटकही केली. मात्र आता पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपलेने बडवण्याची भाषा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. राणे यांच्यावर तत्परतेने कारवाई करणाऱ्या आघाडी सरकारला मुख्यमंत्र्यांच्या या जुन्या या वादग्रस्त विधानाची आठवण या निमित्ताने भाजपकडून करून दिली जात आहे.

मुख्यमंत्र्यांबद्दल असभ्य भाषा बोलल्यामुळे राणे यांच्यावर गुन्हे दाखल होणे, अटक आणि जामीन हा घटनाक्रम काल दिवसभर महाराष्ट्राने अनुभवला. त्यानंतर आज हे प्रकरण शांत होईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांविरोधात आजही वक्तव्य जारी करत आहेत. त्यातच आज यवतमाळचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन मुंदडा यांनी उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरलेला तो व्हिडिओ व्हायरल केला. आता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पाच पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करणार असल्याचे मुंदडांनी सांगितले.

आज यवतमाळचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन मुंदडा यांनी उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरलेला तो व्हिडिओ व्हायरल केला. आता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पाच पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करणार असल्याचे मुंदडांनी सांगितले.

#narayanrane #uddhavthackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...