Mumbai : चित्रा वाघ म्हणाल्या, ''यशोमतीताई , आम्ही तुमच्या सोबत आहोत,'' | Chitra Wagh | Sarakarnama

3 years ago
1

Mumbai : चित्रा वाघ म्हणाल्या, ''यशोमतीताई , आम्ही तुमच्या सोबत आहोत,''

Mumbai : महिला आयोगाला अध्यक्ष नाही, या विषयावरुन भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. वाघ म्हणाल्या की, यशोमती ताई, तुम्ही राज्यातील महिलांचं मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व करतात. तुम्ही आमची आण बान शान आहात. मुख्यमंत्र्यांसह तुम्ही तीन मंत्र्यांकडे महिला आयोगाला अध्यक्ष द्या म्हणून तुम्ही सहा महिन्यापूर्ण फाईल दिली. पण अजूनही त्याच्यावर कार्य़वाही झाली नाही. पण तुमच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नसेल आणि जिथं तुम्हाला आमची गरज वाटेल, त्याठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहोत, मागून देत नसेल तर हिसकावून घ्या. कारण हा प्रश्न तुमचा, माझा नाही तर महाराष्ट्रातील तमाम महिलांचा आहे. आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत येऊ.

#Chitrawagh #yashomatithakur #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...