Success Password | जी. एस. काळे | Sarakarnama |

2 years ago
1

जी. एस. काळे अभियांत्रिकी क्षेत्रातलं एक विश्वसनीय नाव. जी. एस. काळे यांनी लोणावळा भागामध्ये वाहानगाव येथे ‘थीम पार्क इंडिया’ नावाचा जबरदस्त प्रोजेक्ट उभा करण्याचे काम सुरू केले आहे. आमच्या महाराष्ट्राचे ‘भूषण’ असलेला प्रोजेक्ट असणार आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळ्याची ओळख होती; पण आता ती ओळख ‘थीम पार्क इंडिया’ अशी होणार आहे. संस्कृतीसाठी, संस्कारासाठी, माणूस काय करू शकतो, याचं उत्तम उदाहरण जी. एस. काळे आहेत. जी. एस. काळे यांनी ‘थीम पार्क इंडिया’च्या माध्यमातून देशाची प्रतिकृती निर्माण करण्याची मनोकामना प्रत्यक्षामध्ये उतरवली. त्यांना प्रचंड यश आले. तुम्हाला सगळ्या देशाची सफर करायची आहे आणि ते शक्य होत नसेल, तर एकदा ‘थीम पार्क इंडिया’मध्ये जा. तुम्हाला संपूर्ण देश फिरून आलो, प्रत्येक राज्यामध्ये आपण गेलो, असा भास होईल. या देशामध्ये असणाऱ्या संस्कृतीचे वेगळेपण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तुम्हाला हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी थोडासा धीर धरावा लागेल. कारण वाहानगावला सध्या या प्रोजेक्टचे काम जोरात सुरू आहे. याच प्रोजेक्टवर जी. एस. काळे यांच्या अर्धांगिनी प्राजक्ता काळे यांनी पाच हजार एवढी बोनसायची झाडे लोकांना पाहण्यासाठी ठेवली आहेत. ही झाडेसुद्धा या सेंटर फॉर परफेक्ट हेल्थ प्रकल्पाचं खास वैशिष्ट्य आहे. तिथे वैदिक शिक्षण पद्धती दिली जाणार आहे. तिथे भारतीय संस्कृतीचे उत्तम नमुने, त्याचे शिक्षण दिले जाणार आहे. एका इंजिनियरने छंदामधून हा प्रोजेक्ट उभा केला आहे. एका साध्या इंजिनियरपासून कंपनीचे मालक आणि आता थीम पार्क इंडियाचे निर्माता असा जी. एस. काळे यांचा ‘सक्सेस’ डोळे दिपवून टाकणारा आहे. कसा मिळाला जी. एस. काळे यांना सक्सेस? कुठले ‘पासवर्ड’ त्या ‘सक्सेस’साठी होते, हे जाणून घेतले आहे ‘सकाळ’चे संपादक संदीप काळे यांनी.

#sandipkale #sandipkalesakal #gskale#SUCCESSPASSWORD #successpassword
#saam #sakal #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...