Mumbai : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात | Sudhir Mungantiwar | Mumbai | Sarkarnama

3 years ago
1

Mumbai : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात

Mumbai : विठ्ठल मंदिरासह राज्यभरातील देवस्थाने सुरू करावीत या मागणीसाठी आज भाजपाने (BJP) आंदोलन सुरू केले आहे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे नेतृत्वाखाली पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर हे आंदोलन सुरू आहे. अशा वेळी भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्यासाठी भाजपकडून राज्यात विविध ठिकाणी आज आंदोलन केले जात आहे. पुणे, नाशिक, पंढरपुर येथे आंदोलकांनी घोषणा देत ठाकरे सरकारचा निषेध केला. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ते बाबुलनाथ मंदिरात जात होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कार्यकर्त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले आहे. बराच वेळ पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटीत देखील सुरू होती.

#SudhirMungantiwar #BJP #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...