Sonam tigeress with kill

2 years ago
6

सोनम नामक वाघिणीचा शिकार सोबत असलेला व्हिडीओ वायरल

जग प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये व्याघ्र दर्शना करीता देश-विदेशातून पर्यटक येतात व व्याघ्र दर्शन करून फार खुश होतात. ताडोबात वाघाला बघण्यास वारंवार यावा असे प्रत्येक पर्यटकांना वाटत.
असे ही म्हटले जात की  वाघाचे माहेर घर ताडोबाच आहे आणि त्याची एक आठवण म्हणून वाघाचे सुंदर छायाचित्र व विडिओ आपल्या सोबत घेऊन जातात आणि पुढच्या ट्रिपची तयारी करतात.
दि. 05 फरवरी 2022 रोजी दुपार फेरीत सोनम नामक वाघीण सांबर डिअरची शिकार करून आपल्या शवकासाठी तोंडात पकडून नेतानी जे चित्रीकरण केले ते मुबईचे पर्यटक स्वेता सुर्वे व मुग्धा मुलगावकर यांनी आपल्या कॅमेरानी काढलेले विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
वाघीण आपल्या बछड्या करिता शिकार करून त्याचा कडे जातांचा हा विडिओ आहे.
वन समाचार चे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधल्यास ते म्हणाले आम्ही दर वर्षी ताडोबात येतो वाघाचे दर्शन आम्हाला होतच आले आहे या वेळेस देखिल आम्ही मोहर्ली गेट वरून 5 सफारी केले असता आम्हाला प्रत्येक सफारी मध्ये वाघाचे दर्शन झाले. यांचे श्रेय आम्ही महिला गाईड शहनाज बेग व जिप्सी ड्राइवर निकोडे यांना देतो त्याच्या सहकार्यानी हे शक्य झाले असे मला वाटतं आणि ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना मी सांगू इच्छितो की नवीन वाघ  बघिल्यास त्याला नावे देण्याचे काम करू नका हे चुकीचे आहे वाघाला नांवें ठेवणे बंद करावे असे मला वाटत त्याला नंबर देण्याचे काम हे वन विभागाचे आहे त्यांना त्याचे काम करू द्या.

Loading comments...