Success Password | अच्युत पालव | Sarkarnama |

3 years ago
6

सुलेखनकार अच्युत पालव, हे सुप्रसिद्ध कॅलिग्राफी आर्टिस्ट आहेत. जे जे स्कूल ऑफ़ आर्ट मधून पास आउट झाल्यानंतर शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी पंधराव्या शतकात वापरल्या जाणार्‍या मोडी लिपीचा अभ्यास केला. आपल्या कलेतून महाराष्ट्रातील साधू - संतांचा विचार, त्यांच्या रचना जगभरात पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम अच्युत पालव करतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झाले आहे. जगभरात होत असलेल्या अनेक प्रदर्शनात अच्युत पालव यांनी काढलेल्या मराठमोळ्या अक्षरचित्रांची निवड झाली आहे. 'अक्षरभारत' या महत्वाच्या संकल्पनेअंतर्गत अच्युत पालव यांनी सुमारे पंधरा विविध लिप्यांमध्ये मागील वर्षी भारताचे राष्ट्रगीत साकारले होते. सध्या ते डिस्लेक्किस व डिप्रेशन मध्ये असणार्‍या मुलांना कॅलिग्राफीचे धडे देतात. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कॅलिग्राफीने वेड लावणारे, आणि मराठमोळे अक्षरचित्रे जगभरात पोहोचविणारे अच्युत पालव यांच्या यशाचा 'सक्सेस पासवर्ड' जाणून घेतला आहे, सकाळचे संपादक संदीप काळे यांनी आपल्या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमातून...
चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Achyut_Palav #Mumbai
#SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...