Success Password : राज्याचे भूषण डॉ. दीपक म्हैसेकर | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
2

Success Password : राज्याचे भूषण डॉ. दीपक म्हैसेकर

डॉ. दीपक म्हैसेकर महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या त्या प्रत्येक माणसाच्या मनावर कोरलेलं नाव. डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आपल्या शासकीय कारकीर्दीमध्ये सीईओ, जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी अशा अनेक पदांवर काम केलं. एक अधिकारी म्हणून, एक सामाजिक हितचिंतक म्हणून डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जे काम उभं केलं ते नोंद घेण्यासारखेच आहे. पण यापुढे जाऊन त्या-त्या भागात अधिकारी असताना डॉ. दीपक म्हैसेकर यांनी उभं केलेलं काम महाराष्ट्रामध्ये इतिहास होऊन गेले. आता डॉ. दीपक म्हैसेकर स्पर्धा परीक्षेमध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफतपणे सल्ला देण्याचे काम, शिकवण्याचं काम करतात. राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला होता त्यावर राज्यसरकारला डॉ. दीपक म्हैसेकर यांचीच मदत घ्यावी लागली. कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात असलेल्या सगळं प्लॅनिंग, सगळं नियोजन हे डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे होतं. नांदेड पासून महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे डॉ. दीपक म्हैसेकर सध्या पुण्यामध्ये रहिवासी आहेत. त्यांचे वडील गो. रा. म्हैसेकर खासदार होते. त्यांचे भाऊ डॉ. म्हैसेकर सध्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत. घरातून मिळालेले संस्कार, गोदाकाठी मिळालेले धडे या माध्यमातून डॉ. दीपक म्हैसेकर येणाऱ्या पिढीसाठी आदर्श आहेत. डॉ. दीपक म्हैसेकर यांचा हा थक्क करणारा प्रवास संदीप काळे यांच्या 'सक्सेस पासवर्ड' मधून आपल्या समोर मांडत आहोत.

#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Dr_Dipak_Mhaisekar #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...