Beed | बंद साखर कारखाने सुरु करण्याबाबत सरकार उदासीन : शेट्टी |Sugar factory | Politics |Sarkarnama

3 years ago
2

#Sugarfactory #Beed #Sarkarnama
Beed | बंद साखर कारखाने सुरु करण्याबाबत सरकार उदासीन : शेट्टी |Sugar factory | Politics |Sarkarnama
माजलगाव (जि. बीड) : मराठवाड्यातील बंद कारखाने सुरू झाले तर अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार नाही. इतर ठिकाणच्या कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्यामुळे काही ऊस मराठवाड्याच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. येथील कारखानदारा शेतकऱ्यांनी एकरकमी एफआरपी मागू नये म्हणूनच शेतकऱ्यांच्या मनात भीती घालत आहेत. परंतु, एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. मराठवाड्यातले बंद कारखाने सुरु करण्याबाबत शासन उदासीन आहे, असा आरोप करत याबाबत साखर आयुक्तांची भेट घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. (व्हिडीओ : पांडूरंग उगले)
#RajuShetti #Sugargactory #Beed #Marathwada

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...