Success Password : तरुणाईच्या ऊर्जेचा अखंड वाहणारा झरा : कॅप्टन निलेश गायकवाड | Sarkarnama

2 years ago
2

Success Password : तरुणाईच्या ऊर्जेचा अखंड वाहणारा झरा : कॅप्टन निलेश गायकवाड

कॅप्टन निलेश गायकवाड राज्यामधलं सगळ्यांना परिचित असणारे नाव. कॅप्टन निलेश गायकवाडने आपल्या छंदामधून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छबी उमटवली. आपल्या फिरण्याच्या छंदामधून निलेशनी अनेक देशात इथल्या पर्यटकांना आकर्षित करून सातत्याने वेगळेपण देण्याचे काम केले. अंदमान निकोबारला निलेश यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आठवणीसाठी उभी केलेली चळवळ आज महाराष्ट्राला परिचित आहे. केवळ भारतच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून निलेश गायकवाड यांनी महाराष्ट्राचे नाव मोठे केले. पर्यटनाची आवड असणाऱ्या निलेश यांना साहित्यामध्येही कमालीची आवड आहे. निलेश यांनी आतापर्यंत जागतिक पातळीवरचे नऊ विश्व साहित्य संमेलन घेतले. त्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या त्या देशात मराठीचा गौरव करण्याचे काम निलेश यांनी केले. नाशिक व्हाया पुणे अवघ्या जगाचा प्रवास हा निलेशला घेऊन नोंद घेण्यासारखा आहे. आपण छंद जोपासला पाहिजे पण त्यामधून सामाजिक काम घडलं पाहिजे आणि आपल्या जगण्याचा रोजचा तो आवडीचा विषय बनला पाहिजे या हेतूने मधून करिअर निवडले पाहिजे. अशा अनेक गोष्टी, अनेक विषय जेव्हा आपण निलेश यांच्याकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतात. निलेश यांचा एकूणच सर्व प्रवास थक्क करणारा आहे. आज आपण सकाळचे संदीप काळे 'सक्सेस पासवर्ड' या खास कार्यक्रमात निलेश यांच्याशी त्यांच्या आयुष्याबद्दलचा 'सक्सेस' नेमका कसा आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Captain_Nilesh_Gaikwad #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...