Success Password : हजारो युवकांचे पालकत्व स्वीकारणारे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब जाधव | Sarkarnama

3 years ago
2

Success Password : हजारो युवकांचे पालकत्व स्वीकारणारे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब जाधव

प्राचार्य डॉ. भाऊसाहेब जाधव मराठवाडा मित्र मंडळाच्या पुण्यामध्ये असलेल्या मोठ्या चळवळीचा आधारवड भाऊसाहेब जाधव यांनी मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून पुण्यामध्ये उभं केलेलं काम आज इतिहास बनले. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक गोरगरिबांची मुलं आज शिकून अभिमानानं मोठी झालीत. मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेजमधून मोफत शिक्षण ही संकल्पना शाहू महाराजांनंतर अनेक ठिकाणी राबवली गेली. त्यामध्ये पुण्यामध्ये असणारे मराठवाडा मित्र मंडळ अग्रस्थानी आहे. या मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून आज लाखो तरुण आपल्या कामाची पताका दोन्ही बाजूने फडकवताना दिसतात. या मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून उभं केलं गेलेलं काम ते फार मोठं आहे. या कामाला दुरपर्यंत नेणारे जे दोन - तीन मोठी माणसं आहेत त्यामध्ये प्राचार्य डॉ. भाऊसाहेब जाधव यांचं नाव आघाडीवर घेतले जाते. केवळ मराठवाडा मित्र मंडळ नाही तर सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या त्या प्रत्येक चळवळीला आपले समजून वाहून घेण्याचे काम जाधव सर यांनी केले. अनेक न्यायाधीश, डॉक्टर, इंजिनिअर, आयपीएस, आयएएस अधिकारी घडवण्याचं काम करणाऱ्या प्राचार्य डॉ. भाऊसाहेब जाधव यांच्या कामाला सलाम करावा तेवढं कमी आहे. एक व्यक्ती जेव्हा वेगळं काहीतरी ध्येय घेऊन काम करतो लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करतो तेव्हा त्या कामाला सलाम करायला पाहिजे. असंच काम डॉ. भाऊसाहेब जाधव यांच आहे. मराठवाड्यातल्या लातूर सारख्या जिल्ह्यांमधून येऊन, पुण्यात आपला वेगळा ठसा उमटवत महाराष्ट्रात मोठं काम उभं करणाऱ्या डॉ. जाधव यांचा 'सक्सेस', आज संपादक संदीप काळे यांच्या 'सक्सेस पासवर्ड' या खास कार्यक्रमात आपल्या समोर मांडत आहेत.

#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Dr_Bhausaheb_Jadhav #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam Sandip Kale

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...