Success Password | रेणुका कड | Sarkarnama |

2 years ago
3

Success Password | रेणुका कड | Sarkarnama |

रेणुका कड महाराष्ट्रातल्या स्त्री चळवळीचा मोठा आधारवड. कम्युनिटी डेवलपमेंट, विकास अध्ययन केंद्र, एशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्क, एशिया पॅसिफिक नेटवर्क ऑफ इन्व्हॉर्नमेंट, इंटरनॅशनल ब्लाईंड असोसिएशन, एकल महिला, तृतीयपंथी समुदाय, मच्छिमार महिला संघ इ. अशा अनेक सामाजिक संघटनामध्ये, चळवळीमध्ये, संस्थांमध्ये हिरारीने सहभाग नोंदवणारी रेणुका कड सर्वांना परिचयाच्या आहेत. रेणुका कड या उच्च शिक्षित आहेत. स्त्रियांसाठी त्यांनी महाराष्ट्रात उभी केलेली स्वबळाची, स्वावलंबनाची चळवळ खूप मोठी आहे. तृतीयपंथीयांच्या विकासासाठी रेणुका कड यांनी केलेले संशोधन हे खूप महत्वाचे ठरले. आज रेणुका कड यांच्या संशोधनामुळे महाराष्ट्रात तृतीयपंथीना न्याय मिळाला आणि त्यांना चांगले दिवस आले आहेत. गावपातळीवरील महिला स्वावलंबी झाली पाहिजे, तिने हक्काने स्वातंत्र उपभोगले पाहिजे, या लढ्यासाठी रेणुका यांनी आवळलेली मूठ इतिहास बनली आहे. आज 'सक्सेस पासवर्ड'च्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या त्या तमाम कार्यकर्तींना, महाराष्ट्रातल्या त्या तमाम स्त्री चळवळीला प्रोत्साहन देणार्‍या त्या प्रत्येक महिलांसाठी रेणुका कड यांचे योगदान एक धडा असणार आहे. रेणुका कड यांच बालपण, त्याचं शिक्षण, त्यांचा इतिहास आणि विशेषतः सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेलं काम, खूप मोठा लढा उभारून त्याचा महाराष्ट्रामध्ये एक इतिहास झाला आहे. आज 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेणुका कड यांचा 'सक्सेस पासवर्ड' आपल्या समोर येत आहे. चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.

#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Renuka_Kad #Mumbai
#SUCCESS_PASSWORD #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...