पीक विम्यावरून आमदार नितीन देशमुख आक्रमक; नियोजन भवनातील डीपीडीसी बैठकीवर टाकला बहिष्कार...!

8 months ago
21

एचडीएफसी अर्गो कंपनीने २०२३-२४ मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला मागणी करूनही सादर केली नाही. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची लदावा यादी, सर्वेक्षण झालेली यादी, पात्र आणि अपात्र यांची यादी, खरीप आणि रब्बी पंचनामे प्रती इतर दस्ताऐवज कंपनीने कृषी विभागाला सादर केले नाहीत. यामूळे बाळापूर तालुक्यातील ७ हजार ५५६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य परतावा मिळाला नाही. यामुळे सदर कंपनीवर बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याच मुद्द्यावरून आमदार देशमुख हे आक्रमक झाले होते.

Loading 1 comment...