म्युच्युअल फंडात मुदत ठेवी (FD) पेक्षा जास्त नफा मिळू शकतो., तुम्हीपण पैसे गुंतवले का?

11 months ago
13

म्युच्युअल फंडात मुदत ठेवी (FD) पेक्षा जास्त नफा मिळू शकतो., तुम्हीपण पैसे गुंतवले का?

ELSS Mutual Funds to Invest: जर बाजारातील धोका पत्कारून गुंतवणूक करण्यासाठी सज्ज आहात तर ELSS म्युच्युअल फंड तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. या अंतर्गत तुम्हाला १.५ लाखांच्या गुंतवणुकीवर कर बचत करण्याची संधी तर मिळतेच, पण तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून प्राप्तिकराच्या कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. कर बचतीचा हा लाभ म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) मध्ये उपलब्ध आहे.

ELSS म्युच्युअल फंड

हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे, जो प्रामुख्याने इक्विटी किंवा इक्विटी ओरिएंटेड उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतो ज्यात बँक एफडीपेक्षा (मुदत ठेव) जास्त परतावा मिळतो. ELSS मधील परताव्याची हमी नसून गुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. तसेच कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूटचाही . ELSS चा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे.

कोणत्या म्युच्युअल फंडांनी दिला किती परतावा

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या वेबसाइटवरील ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या डेटानुसार अशा पाच ELSS आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना १० वर्षात १८ ते २५% वार्षिक परतावा दिला आहे.

क्वांट म्युच्युअल फंड

क्वांट म्युच्युअल फंडाच्या क्वांट टॅक्स प्लॅन योजनेने दहा वर्षांत गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा दिला असून या कालावधीत योजनेचा सरासरी वार्षिक परतावा २५.२५ टक्के आहे.

बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड

बँक ऑफ इंडिया ॲडव्हांटेज फंडात पैसे गुंतवणाऱ्या लोकांना गेल्या दहा वर्षांत बँक एफडीपेक्षा अडीच पट जादा परतावा मिळाला आहे. या योजनेचा सरासरी वार्षिक परतावा १९.१०% आहे.

गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक परतावा देणारे ELSS फंड

गेल्या दहा वर्षांत गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देणाऱ्या ELSS मध्ये बंधन ELSS टॅक्स सेव्हर फंडचाही समावेश आहे. या योजनेचा गेल्या दहा वर्षांतील सरासरी वार्षिक परतावा १९.०३ टक्के आहे.

डीएसपी टॅक्स सेव्हर फंड

तसेच कर बचत आणि बक्कळ नफा कमावण्यासाठी तुम्ही DSP टॅक्स सेव्हर फंदातही पैसे गुंतवू शकता. या करबचत फंडाने गेल्या दहा वार्षिक १८.८४ टक्के परतावा नोंदवला आहे.

सर्वाधिक परतावा देणारे ELSS फंड

याशिवाय जेएम ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या दहा वर्षांत गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला असून या योजनेचा सरासरी वार्षिक परतावा १८.७५ टक्के राहिला आहे.

तरी आपण म्युच्युअल फंडात दररोज 10₹ पासून ही गुंतवणूक करू शकता. किंवा एकरकमी पैसे ही भरू शकता.
त्यासाठी खलील लिंक वापरून सदर अँप वापरून गुंतवणूक सुरू करू शकता.
https://g.navi.com/ZpVCO
सदर अँप (NPCI approved) तर्फ सुरक्षित आहे

सदर म्युच्युअल फंड सगळ्यात जास्त वापरले जातात.
01.Nifty Midcap 150 Index Fund.
02.Nifty 50 Index Fund.
03.Nifty Next 50 Index Fund.
04.Nifty Bank Index Fund.
05.Flexi Cap Fund.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे डिस्क्लेमर

(Disclaimer: येथे नमूद केलेले म्युच्युअल फंड आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यावर आधारित आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणत्याहीमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुम्हाला होणाऱ्या कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी आम्ही जबाबदार नाही.)

Loading comments...