मराठा समाज आक्रमक; मोदींच्या दौऱ्यासाठी आलेल्या बस गाड्या परत पाठवल्या | PM Modi in Shirdi

11 months ago
1

मराठा समाज आक्रमक; मोदींच्या दौऱ्यासाठी आलेल्या बस गाड्या परत पाठवल्या | PM Modi in Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचा फटका मोदींच्या दौऱ्याला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, मोदींच्या दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या बस गावकऱ्यांनी परत पाठवल्या आहेत. मोदींच्या दौऱ्यासाठी नागरिकांनी नेण्यासाठी खासदार सुजय विखेंनी बस गाड्या पाठवल्या होत्या, असे समजते. विखे कुटुंबियांच्या विरोधात शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या गावात पुढाऱ्यांना येण्यासाठी गावकऱ्यांनी बंदी घातली आहे.

#marathapotester #marathareservation #pmmodi #shirdi #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...