Premium Only Content

आध्यात्मिक (Spiritual ): उपाधी वासना नाहीशा करण्यासाठी नाम घेण्याची असते.
https://youtu.be/rf4X-BIadN8
२४ ऑक्टोबर
🙏श्री राम समर्थ🙏
परमेश्वराची खरी पूजा.
देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. 'मी साधन करतो' असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातुक असतो. तेव्हा, जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे. आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते, आणि तो सर्व तुमच्या बर्याकरिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे, चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी; म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बर्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते. सर्वांभूती भगवद्भाव, आणि कोणाचे मन न दुखविणे, ही पूजा खरी होय. पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरूर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.
भक्ति आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ति, आणि विषयाची अनासक्ति म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले. त्या वेळी तिने उत्तर दिले की, 'रामा ! तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत; आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत.' सीता ही रामाची मोठी भक्त होती, आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही. आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा; तो हा की, आपण म्हणावे, 'रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.' असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल.
'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही.
आजचे बोधवचन
उपाधी वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते.
श्री महाराज
जानकी जीवन स्मरण जय
जय राम
-
1:31:52
Chicks On The Right
4 hours agoFallout from Biden's diagnosis, LaMonica charged, Scott Adams' wisdom
24.8K8 -
LIVE
LFA TV
13 hours agoLFA TV LIVE STREAM - TUESDAY 5/20/25
10,195 watching -
32:24
Kitco NEWS
13 hours agoIs Another Massive Market Crash Coming? Ted Oakley Reveals Critical 90-Day Warning
3.63K1 -
LIVE
The Pete Santilli Show
14 hours agoTrump EO’s Cured Biden’s Addiction To China & Exposes Real Reason for Afghan Withdrawal [EP4558-8AM]
901 watching -
The Bubba Army
22 hours agoTrump vows to END the war! - Bubba the Love Sponge® Show | 5/20/25
314K12 -
2:01:50
BEK TV
1 day agoTrent Loos in the Morning 5/20/2025
24.5K -
28:34
Scary Mysteries
19 hours ago5 REAL Murder Cases More Twisted Than Horror Movies
56.6K8 -
8:46
The Art of Improvement
23 hours agoBuilding iron discipline
74.9K10 -
LIVE
PudgeTV
3 hours ago🔶DOOM: The Dark Ages | Half Way Through the Game | Gaming on Rumble
267 watching -
10:05
Adam Does Movies
18 hours ago $3.74 earnedRebel Moon Is DEAD
49.9K14