Aayushman Bharat | आयुष्मान भारत योजना कार्ड कसे काढावे ?

1 year ago
7

_*💁🏻‍♀️आयुष्मान भारत योजनेत तुमचे कार्ड बनवता येते का? या 4 स्टेप्समध्ये जाणून घ्या*_

_*⚡Whatstik - Digital Magazine*_

💁🏻‍♀️ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील 10 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आलीय. पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.

💁🏻‍♀️तर तुम्हाला आधी तुमची पात्रता तपासावी लागेल

जर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचे कार्ड मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी तुमची पात्रता तपासावी लागेल. हे काम खूप सोपे आहे आणि घरी बसून ऑनलाईन करता येते. तुमच्या मोबाईल क्रमांकावर लॉगिन करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समावेश आहे की नाही हे शोधू शकता. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्या कुटुंबाचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीत समावेश असेल, तर तुम्ही वैद्यकीय उपचारासाठी कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता

💁🏻‍♀️या चार टप्प्यांचं पालन करा

▪️सर्वप्रथम पीएम जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईट mera.pmjay.gov.in वर जा

▪️ येथे तुम्हाला डाव्या हाताला LOGIN लिहिलेले दिसेल, जिथे मोबाईल नंबरची माहिती विचारली जाईल. एंटर मोबाईल नंबरसह कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या खाली तुम्हाला कॅप्चा कोड भरा, तोच टाका. यानंतर तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल
▪️यानंतर तुम्हाला तुमच्या प्रांत आणि जिल्ह्यावर क्लिक करावे लागेल.
▪️हे केल्यानंतर तुम्हाला दस्तऐवज किंवा आयडी क्रमांक निवडण्यास सांगितले जाते. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्चवर क्लिक करा.

💁🏻‍♀️ जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पीएम आरोग्य योजना (PMAY) द्वारे आयुष्मान कार्ड दिले जाईल. या कार्डद्वारे तुमच्या कुटुंबाला एका वर्षात कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील.

▪️पीएमएवाय अंतर्गत सरकारने देशभरातील निवडक रुग्णालये सूचीबद्ध केली आहेत, ज्याची माहिती पीएम जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

👍 PMJAY ची वैशिष्ट्ये

▪️या योजनेला केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे आणि केंद्र त्याचे संपूर्ण पैसे देते. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे
▪️या योजनेअंतर्गत देशातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध आहे, जी आयुष्मान भारत योजनेंतर्गत सूचीबद्ध आहेत.
▪️या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
▪️एका वर्षात 10.74 कोटीहून अधिक गरीब आणि वंचित कुटुंबे किंवा सुमारे 50 कोटी लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
▪️ या योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल होण्याच्या 3 दिवस आधी आणि उपचारानंतर 15 दिवसांनी आरोग्य उपचार आणि औषधे मोफत उपलब्ध आहेत.
कुटुंब कितीही मोठे किंवा लहान असले तरी या योजनेचा लाभ तितकाच दिला जातो.
▪️या योजनेअंतर्गत आधीपासून अस्तित्वात असलेल्या विविध वैद्यकीय परिस्थिती आणि गंभीर रोगांना पहिल्या दिवसापासून संरक्षण देण्यात आले.

_*⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन होण्यासाठी क्लिक करा*_  👉 https://whatstik.in

_*💁🏻‍♀️ जाहिरातीसाठी संपर्क : 8888153956*_

Loading comments...