भाजीला उत्तम पर्याय, सगळे खातील आवडीने, पाहा सोपी रेसिपी | कारल्याचे चिप्स | Karela Chips Recipe

1 year ago
5

आरोग्यवर्धक कारल्यापासून तयार करा कारले चिप्स | १० मिनीटांत करा कारल्याचे टेस्टी चिप्स, भाजीला उत्तम पर्याय, सगळे खातील आवडीने, पाहा सोपी रेसिपी... | Bittergourd Chips
#marathi
#karela
#howtomakekarelachipsinmarathi

कारल्याची भाजी म्हटली की घरातील सगळेच नाक मुरडतात. कारलं चवीला कडू असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच ते नको असते. मात्र आरोग्यासाठी हे कडू कारलं खाणं अतिशय फायदेशीर असतं. आता या कारल्याचा कडूपणा घालवायचा कसा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकींना स्वयंपाक करताना पडतो. मग कधी ते खूप काळ पाण्यात भिजवून, फडक्यात बांधून किंवा चिंच-गूळ घालून भाजी केली तरी ती थोडी का होईना कडू होतेच. मग औषधाप्रमाणे ही भाजी खावी लागते. पण जबरदस्ती अशी भाजी खाण्यापेक्षा या कारल्याचे कुरकुरीत चिप्स केले तर?

हे चिप्स खायलाही छान लागतात आणि कारलंही खाल्लं जातं. चिप्स हा लहानग्यांचा आणि मोठ्यांचाही आवडता प्रकार असल्याने ते आवडीने खाल्ले जातात. आता हे चिप्स करायचे कसे?

कडू न लागणारे कारल्याचे चिप्स | कारले कोणाला नाही आवडत!

Loading comments...