*अपनयन झालेल्या 12 वर्षाच्या मुलीचा 8 तासांमध्ये MHB Police तर्फे शोध! Mhb police station

1 year ago
34

*अपनयन झालेल्या 12 वर्षाच्या मुलीचा 8 तासांमध्ये शोध*
#mhbpolice
#mhbpolicestation
#24x7MaharashtraNews
#policenews
#dailynews
#mumbaipolice

एम एच बी पोलीस ठाणे *गु.रु .क्र. 49/23 कलम 363 भादवी* अन्वये अपनयन झालेली अल्पवयीन मुलगी नावे भावना राजेंद्र चौधरी वय 12 वर्ष ही दिनांक 29 /1 /2023 रोजी घरातून ट्युशनला जाते असे सांगून निघून गेली होती. सदरबाबत दिनांक 29 /1 /2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर व.पो.नी. सुधिर कुडाळकर Mhb पोलिस ठाणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एम एच बी पोलीस ठाण्याचे दिवस पाळी पर्यवेक्षक सपोनी पाटील, रात्रपाळी पर्यवेक्षक पो.नि.नागटिळक, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि पवार व पथक तसेच रात्रपाळी मोबाईल 1 वरील स्टाफ व अधिकारी, रात्रपाळी निर्भया अधिकारी व पथक हे सदर मुलीचा शोध घेणे कामी तात्काळ पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाले होते. *अपनयन झालेल्या मुलीकडे मोबाईल नसल्याने तपासामध्ये अडथळे येत होते* परंतु वेगवेगळे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून मुलीचा माग घेतला असता ती बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची शक्यता वाटल्याने एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याचे पथक बोरिवली रेल्वे स्टेशन येथे गेले असता सदर अपनयन झालेली अल्पवयीन मुलगी भावना चौधरी वय 12 वर्ष ही बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या परिसरात मिळून आली .तिला आई वडिलांच्या समवेत पोलीस ठाणे येथे आणून तिच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला आहे की नाही याबाबत खात्री केली. तसेच तिची वैद्यकीय तपासणी करून तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले .

सुधीर कुडाळकर

वरिष्ठ पोलीस निरीक्षक
MHB कॉलनी पोलीस ठाणेMhb police station

https://youtube.com/@24X7MaharashtranNews

Loading comments...