तू यावं...तू यावं... बंधन तोडीत यावं...

2 years ago
2

#nageshspeaks #ganeshwaghmare #friendship
.
आमच्या मैत्रीला तब्बल १२ वर्ष पूर्ण होतात...जेव्हाही भेटू चळवळीच्या गोष्टी बोलून जुन्या आठवणींना उजाळा देत असतो. गणेश हा स्वभावाने शांत,संयमी आहे किंव्हा असतो असं म्हणायला हरकत नाही. गणेश सोबत राहत असतांना भरपूर मित्र,मैत्रिणींची ओळख झाली. सर्व वैचारिक मैत्री होती. यांच्या वैचारिक बोलण्यातून असं वाटायचं आपण यात अड्जस्ट होणार का...? पण काही काळाची ती मैत्री पण आजही सर्व मित्र आठवतात....

पुण्यातील नामवंत संस्थेतून एम.एस.डब्लू पास झाला. आपल्या परिस्थितीवर मात करत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज सुरु असतांना त्यांनी आंबेडकर चळवळीत आपले योगदान सातारा आणि पुण्यात दिले. हालाकीच्या परिस्थितीवर मात करत एका शिक्षण संस्थेत गणेश हा रुजू झाला. काही वर्ष अशीच गेली. त्यानंतर गणेश ने जवळपास ४५ हजार प्रति महिना पगार असतानाही आपला जॉब सोडला.
जॉब सोडण्यानंतर गणेश आणि माझी भेट झाली. जवळपास दोन ते तीन तास आमची चर्चा झाली. त्यात त्याच्या परिस्थिती विषयी, डिप्रेशन, निर्णय घेण्याबाबत त्याने त्याच्या बायकोशी केलेला संवाद यावर चर्चा झाली. यावर त्याने मलाही काही गोष्टी समजावून सांगितल्यातच पण मी म्हणलं त्यासाठी बायको पण समजूतदार आणि निर्णयात साथ देणारी हवी, त्यावर गणेशने आपले स्मिथ हास्य कायम ठेवत. म्हणाला, अजून भयावह स्थिती येणार आहे. सज्ज रहा...!😜 गमतीचा भाग जाऊदेत, पण मित्र हे मित्रच असतात जिथे आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात. जिथं आपण आपल्या अश्रूनाही थांबवू शकत नाही. जिथं बांधनांना परवानगी नसते. बारा ते चौदा वर्षाच्या मैत्रीत भांडण,तक्रार कुठेही नाही. फक्त आणि फक्त काळजी...प्रेम...समजूतदारपणा...सामंजस्यपणा...एवढंच....
.
.
गणेश भावी आयुष्यात खूप मोठा हो...याच माझ्याकडून शुभेच्छा तुला....🫂
.

Loading comments...