...तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला धोका नाही : अजित पवार | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

...तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला धोका नाही : अजित पवार

बारामती : ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार आले, त्या दिवसापासून त्यांना (भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील) असह्य झालं आहे. त्यांना आपण सरकारमध्ये नाही, ही सतत बोचणी लागून राहिली आहे. आपल्या सगळ्यात जास्त जागा येऊनही आपण सरकारमध्ये नाही, त्या मानसिकतेतून ते बाहेरच यायला तयार नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे जाऊ नये, त्यामुळे सतत एक पुडी सोडण्याचे काम पाटील करतात. जोवर सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तोवर महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

#ajitpawar #baramati #pune #mahrashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...