केंद्र सरकार म्हणतंय, पूर्व विदर्भातील तांदूळ खाण्यायोग्य नाही; नानांचा खळबळजनक आरोप | Nana Patole |

3 years ago
2

केंद्र सरकार म्हणतंय, पूर्व विदर्भातील तांदूळ खाण्यायोग्य नाही; नानांचा खळबळजनक आरोप..
भंडारा : पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांतील शेतकरी पिकवत असलेला तांदूळ खाण्यायोग्य नाही, असे प्रमाणपत्र केंद्र सरकार दिले असल्याच्या खळबळजनक आरोप कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. भंडारा-गोंदीया जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मात्र धडकी भरली आहे. भंडारा-गोंदीया जिल्ह्यांतील लोक, शेतकरी, कामगार जिल्ह्यात पिकविलेल्या धानाचा तांदूळ खात आहेत. अद्याप तरी जिल्हातील लोकांना कोणतेही अपाय झाले नाहीत. त्यामुळे कोणत्या निकषांद्वारे १११ प्रकारचे धान खराब असल्याचे केंद्र सरकार म्हणत आहे, असा प्रश्‍न पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना पडला आहे.

#NanaPatole #Bhandara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...