अविश्वास मंजूर झाल्यावर शिवसेना सदस्या ज्योती अरगडेंना रडू कोसळले | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात शिवसेना सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव अनेक नाट्यमय घडामोडीनंतर ११ विरूद्ध ३ मतांनी मंजूर झाला. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहाबाहेर आल्यावर शिवसेनेच्या सदस्या ज्योती अरगडे यांना मात्र रडू कोसळले. (स्व.) माजी आमदार सुरेश गोरे यांच्याशी त्यांनी निवडून आणलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी इमान राखलं नाही, असा घाणाघाती आरोप ज्योती अरगडे यांनी केला आहे. तसेच, आपले पती केशव अरगडे यांना विनाकारण या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोपही अरगडे यांनी केला आहे.

#sarkarnama #rajgurunagar #politics #panchyatsamiti

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...