जेंव्हा मंत्री छगन भुजबळ चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होतात.. Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

मंत्री छगन भुजबळ हे एका चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. छगन भुजबळ हे आज नाशिक येथील येवला दौऱ्यावर असताना त्यांना ऐका चिमुरडीने स्वतःचे गाणे ऐकण्याची विनंती केली. भुजबळांनी देखील लगेच होकार देत तिला गायला सांगितले आणि तिच्या आवाजातीस सुंदर गाणे ऐकत भुजबळ मंत्रमुग्ध झाले..
येवला तालुक्यातील नांदूर या छोट्या गावातील श्री.गौतम पगारे यांची कन्या कु.आम्रपाली हिने आज आपल्या आवाजात मंत्री छगन भुजबळ यांना गाणे ऐकवले. यावेळेस भुजबळ यांनी चिमुकलीचे गाणे ऐकत तिच्या गाण्याला दाद दिली व तिचे कौतुक देखील केले. यावेळी उपस्थित नागरिक देखील आम्रपालीच्या गाण्याने भारावून गेले.
संगीत क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना स्वयं मेहनतीने रियाजाने आम्रपाली हीने आपला आवाज जपला आहे याचे विशेष कौतुक असल्याचे देखील भुजबळ म्हणाले.

#sarkarnama #Music #chaganbhujbal #maharashtra #politics #singinggirl
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...