होय, आम्ही सर्टिफाईड गुंड!| Shivsena |Sanjay Raut | Politics | BJP |Mumbai | Maharashtra |Sarkarnama

4 years ago
2

शिवसेना भवनासमोर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी मोठा राडा झाला. याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना गुंडगिरी करते, होय करते. सत्तेचा माज मात्र चुकीचे आहे. काल जर सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर वेगळा प्रकार घडला असता. गुंडगिरीचे म्हणाल तर शिवसैनिक व शिवसेना भवनावर कुणी चाल करून येत असेल तर होय आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राची अस्मिता व हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने त्यावेळी केंद्राविरोधात केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. ही गुंडगिरी आम्ही करत राहिलो म्हणून आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज आहे, असे राऊत म्हणाले.

#SanjayRaut #Shivsena #ShivsenaBhavam #Mumbai #Maharashtra #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...