आशांनी मारला जिल्हा परिषदेच्या मैदानावर ठिय्या...| Satara |AshaSwayamsevika|Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

सातारा : कोरोना सर्व्हेसाठी दर दिवशी ५० रुपये मोबदला देण्यात यावा. आशांना किमान १८ हजार रुपये वेतन द्यावे. गटप्रवर्तकांचा प्रवासभत्ता दुप्पट करा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा आशा वर्कर्स संघटनेने आज सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर निदर्शने केली. तसेच, संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना मागण्यांचे निवेदन दिले. संघटनेच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, माणिक अवघडे, कल्याणी मराठे, राणी कुंभार, सुवर्णा पाटील, पल्लवी नलावडे, रूपाली पवार, जयश्री काळभोर, रंजना फुले, रंजना पवार, शोभा कळंबे, मंगल जाधव, ज्योती यादव, सुवर्णा कदम, सुषमा अवकिरकर, उषा वेल्हाळ, विद्या कांबळे, पुष्पा मगर, सुमन वसव यासह आशा व गटप्रवर्तका सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्याने पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला परवानगी नाकारल्याने काही काळ जिल्हा परिषदेच्या बाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संतप्त आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद मैदानावर ठिय्या मांडला.

#Satara #AshaSwayamsevika #Maharashtra #Satarazpground #Demand

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...