उद्धवसाहेब...बाळासाहेबांची Shivsena वाचवा अन्यथा त्यांच्याच स्मृतीस्थळावर आत्मदहन| Beed| Sarkarnama

3 years ago

बीड - शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा. पवित्र मातोश्रीच्या आड संपर्कप्रमुखांनी घात केला म्हणून आनंद जाधव यांचेही नाव घेत ३० तारखेपर्यंत अप्पासाहेब जाधव यांची निवड रद्द करावी अन्यथा शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आत्मदहन करणार, असा टाहो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने माजलगाव शहर प्रमुख धनंजय सोळंके यांनी फोडला आहे. माझा टाहो शिवसेना वाचावी, निष्ठावंत शिवसैनिकांसाठी आहे. हा निर्णय तुम्हाला विचारुन झालेला नाही, तुमच्या आडून झालेला आहे. शिवसेना भवनावरुन हाकलून दिले म्हणून हा व्हिडीओ शेअर करावा लागला असेही, धनंजय सोळंके यांनी म्हटले आहे. चार दिवसांपूर्वी श्री. जाधव यांची निवड झाल्यापासून श्री. सोळंके विरोध करत आहेत. निषेध केला म्हणून जाधव समर्थकांनी भर रस्त्यावर श्री. सोळंके यांना चाबकाचे फटके दिले. (व्हिडीओ : दत्ता देशमुख)

#Beed #Shivsena #uddhavthackeray #Majalgaon #DhanjaySolanke

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...