कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन | Sarakarnama

3 years ago
2

कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिका वाहतुकीसाठी खुली

मुंबई, दि. २८ : - कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका आज वाहतुकीसाठी खुला झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अड. अनिल परब, पर्यटन, पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उड्डाणपुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाल, या परिसरात माझे बालपण गेले. १९६६ पासून आम्ही या परिसरात राहतो आहोत. या परिसराशी निगडीत खूप आठवणी आहेत. आता या परिसरात खूप वस्ती वाढली आहे. बीकेसी सारखे संकुलही उभे राहीले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा समस्या निर्माण होऊ लागली होती. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आता कलानगर जंक्शन येथे आणि परिसरातील वाहतूक कोंडी होणार आहे.’’

#kalanagarjunction ##inauguration #UdhhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...