राजकारणात एकेकाळी शब्दाला किंमत होती : सुशिलकुमार शिंदे | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

राजकारणात एकेकाळी शब्दाला किंमत होती : सुशिलकुमार शिंदे

आजकाल राजकारणात शब्दाला किती किंमत आहे, हेही मला माहिती नाही. पण, ती एकेकाळी होती. शंकरराव बाजीराव पाटील असताना राज्यसत्तेत काय किंमत होती, ते आम्हाला माहिती आहे. शिबिराला आम्हीसुद्धा वही-पेन घेऊन जायचो. ती एक काँग्रेसची विचारांची, शिबिरांची परंपरा होती. ती सध्या राहिलेली नाही, याचे आम्हाला दुःख होतंय. शिबिराची आणि विचाराची परंपरा सध्या राहिली नसल्याने आम्ही सध्या कुठे आहोत, हे पाहणे कठीण झालेले आहे. आमची धेय्य धोरणं चुकीची असली तरी ती बरोबर करण्यासाठी विचारांच्या शिबिराची गरज आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील सध्याच्या त्रुटीवर बोट ठेवले. ते इंदापूर येथे नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.

#politics #sushilkumarshinde

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...