पडळकर समर्थकांचा सोलापुरात NCPच्या कार्यालयावर हल्ला | Solapur | Gopinath Padalkar | Sarkarnama

3 years ago
2

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी (ता. ३० जून) सोलापुरात हल्ला झाला होता. त्यानंतर आज (ता. १ जुलै) पडळकर समर्थकांनी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. दोन तरुणांनी दगडाच्या साहाय्याने खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी कार्यालयावर दगड फेकून पडळकर यांच्या समर्थनाच्या घोषणाही दिल्या. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या दोन तरुणांची नावे शरणू हांडे आणि सोमनाथ घोडके अशी आहेत. ते दोघेही स्वतःहून पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पडळकरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केला. आम्ही पळून न जाता पोलिस ठाण्यात जात आहोत. पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकणाऱ्यास पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही, म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करून आम्ही निषेध नोंदविला आहे, असेही ते म्हणाले.

#Solapur #NCP #GopinathPadalkar #SolapurNCPOffice #Police

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...