३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार

३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वाची आणि मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत केली. एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्या प्रकरणावर बोलत असताना अजितदादा म्हणाले की, ही घटना अतिशय वेदनादायी अशी आहे. अशी घटना कुणासोबतच घडू नये, या मताचे राज्य सरकार आहे. तसेच स्वप्निल लोणकरच्या कुटुंबाला आर्धिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकार लोणकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे अजितदादा यांनी सांगितले.

#mpsc #ajitpawar #swapnillonkar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...