शिवसेने कडून रवी राणांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन | Ravi Rana | Amravati | Sarakarnama

3 years ago
2

मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका केल्यामुळे शिवसेने कडून रवी राणांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन

अमरावती : बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आक्षेपार्ह विधान केले होते. दरम्यान या विधानानंतर राज्यभरात शिवसेनेकडून रवी राणा यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अमरावतीच्या परतवाडा मध्ये संतप्त शिवसैनिकांनी आमदार रवि राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्या फोटोचे दहन केले आहे. आमदार रवी राणा यांनी आधी शिवसैनिकांच्या घरासमोर बेसरमचे झाड लावून दाखविण्याची हिंमत दाखवावी आणि नंतर मातोश्री समोर झाड लावण्याच्या गप्पा मारावा असा इशाराही शिवसैनिकांनी दिला. आज फक्त रवी राणा च्या फोटोला चपलांचा हार घातला आहे. परंतु रवी राणा यांनाही चपलांचा हार घालायला शिवसेना मागेपुढे पाहणार नाही असही शिवसेनेने म्हटलं आहे.

#RaviRana #amravati

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...