Hot water coming from borewell : यवतमाळ जिल्ह्यात भूकंपानंतर बोअरमधून आले उकळते पाणी... | Sarkarnama

3 years ago
1

महागाव- शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोडा येथील सेवानिवृत्त शिपाई माधव भोयर यांच्या राहत्या घरी असलेल्या विंधन विहिरीतून अचानक गरम पाणी येऊ लागले आहे. दोन दिवसांपूर्वी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र महागाव तालुक्यातील साधुनगर असल्याचे आणि रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी नोंदवण्यात आली होती. मात्र भूकंपाचे केंद्र असलेल्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. मात्र भोयर यांच्या घरी असलेल्या विंधन विहिरीतून (बोअर) उकळते पाणी येत असल्याने हा भूकंपाचा परिणाम तर नाही ना, अशी शंका गावकऱ्यांना आहे.
#Yavalmal #Hotwater #borewell #vidarbha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...