मुख्यमंत्र्यांनी जनाची नाहीतरी मनाची लाज बाळगुन विठ्ठलाच्या महापुजेला येवु नये | Sarakarnama

3 years ago
1

मुख्यमंत्र्यांनी जनाची नाहीतरी मनाची लाज बाळगुन विठ्ठलाच्या महापुजेला येवु नये.

एका बाजुला सर्व संतांच्या पालख्या पायी जाण्याची प्रथा मोडून काढायची, पालखी बरोबर अगदी ५० वारकरी चालु दे अशा विनंतीलाही धुडकावुन लावायचे. पायी चालु द्यायचे नाही. पायी चालणाऱ्या वारकऱ्यावर दहशतवाद करायचा. पताका, टाळ, चिपळी हिसकावुन घ्यायची आणि दुसऱ्या बाजुला पांडूरंगाची महापुजा करण्याचा हाट कशासाठी ?

संतांचा अनादर करून केलेली आपली महापुजा पांडूरंगाला मान्य होणार नाही. म्हणुन मुख्यमंत्र्यांनी महापुजेला येण्याचे टाळावे असे मत जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले.

मुख्यमंत्र्यांची दांभिक पुजा पाडूंरग स्विकारणार नाही.

बंडातात्या कराडकर यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टिका.

#bandatatyakaradkar #UddhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...