Chiplun Floods : नागरिकांनी घाबरू नये; सेनेच्या दोन मंत्र्यांचे आवाहन | Chiplun | Sarakarnama

3 years ago
1

Chiplun Floods : नागरिकांनी घाबरू नये; सेनेच्या दोन मंत्र्यांचे आवाहन

वशिष्टी नदीला पूर आल्याने Chiplun मधील परिस्थिती बिकट झाली आहे. याबाबत Ratnagiri चे पालकमंत्री Anil Parab आणि उच्चशिक्षण मंत्री Uday Samant यांनी शहरवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. पावसामुळे मदत पोहोचण्यात काही अडचणी येत असल्याचे सांगत लवकरच मदत पथके तेथे येतील, असे स्पष्ट केले. ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहे. २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्याची ही दृश्ये.

#udaysamant #anilparab #chiplun #Ratnagiri

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...