Chhagan Bhujbal's Big Announcement : आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण |Sarkarnama

3 years ago

Chhagan Bhujbal's Big Announcement : आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण

आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत Shivbhojan थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्री Chhagan Bhujbal यांनी जाहीर केला.

पूर परिस्थीतीमुळे अनेक जिल्ह्यांत लाईट नाही अशा ठिकाणी मोफत kerosene चे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी Shivbhojan केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून Shivbhojan चे पाकिटे वितरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाईट नसलेल्या ठिकाणी किंवा Shivbhojan अँपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सहा आपत्तीग्रस्त जिल्ह्यांत प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार असल्याची माहिती Bhujbal यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हा ऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला ५ किलो डाळ देण्याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे.

#ChhaganBhujbal #maharashtrafloods #shivbhojanthali

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...