Nana Patole: ओबीसींना आरक्षण संविधानाने दिले, दाढीवाल्या मोदींनी नाही | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

औरंगाबाद: या देशांमध्ये गरीब आणि मागास वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Babasaheb Ambedkar) संविधानामुळे आरक्षण मिळाले. पण दाढीवाले मोदी(Narendra Modi) मात्र ओबीसींना आरक्षण आम्ही दिल्याचा दावा करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी औरंगाबादेत(Aurangabad) बोलताना केली. राजकारणामध्ये महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी(Rajiv Gandhi) यांनी घेतला होता. त्यामुळेच राजकारणात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, असे सांगतानाच या संविधानाला बाधा पोहोचवण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.
#nanapatole #congress #babasahebambedkar #rajivgandhi #narendramodi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...